आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ
माझ्या जीवनाचा हरएक क्षण तुझ्या रक्षणार्थ असेल
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासचतो सदैव उरलेला असेल
http://marathismita.createaforum.com/sms/235223252381235923662348230623432344-special/
प्राजक्ताचे सडे......!
मी सोडून दिले कधिचेच वाट पहाणे .... कधी, केव्हा पडतील अंगणी प्राजक्ताचे सडे......! तू मनातच बरसत रहा मी झेलीत राहीन तुझे अविरत … आठवणींचे सडे .....!
Wednesday, 17 August 2016
Thursday, 11 August 2016
Wednesday, 10 August 2016
महाड पोलादपूर ठिकाणी जी घटना घडली त्या बद्दल चार ओळी लिहित आहे, त्यांचं दुःख आणि त्यांना झालेल्या यातना कोणीही शब्दात मांडू शकत नाही पण मी एक वेडा वाकडा प्रयास करत आहे त्यांच्या वेदना तुमच्या पर्यंत पोह्चविण्या चा, काही चुकलं किंवा कोणाचं मन दुखावलं गेलं तर माफ करा..
●●●●डोंगर दुःखाचे●●●●
इच्छा सगळ्या भिजल्या स्वप्नं गेली वाहून,
आई घर बांधायचं, अगं गेल ना आता राहून..
आई म्हटली नको जाऊ पाऊस जरा थांबू दे,
मन माझं मानत नाही रात्र तेवढी जाऊदे..
माफी मागतो आई तुझी मी हाथ माझे जोडूनी,
ऐकलं नाही काही तुझं मी गेलो तुला सोडूनी..
भाऊ माझा भोळा, बॅग माझी देऊन
म्हणला दादा येताना जीन्स ये घेऊन...
बहीण माझी छोटी करायचं होतं लगीन,
बोलली रक्षाबंधना ला वाट तुझी बघीन..
बायको सर्व बघत होती डोळे आले भरून
निघालो घरा बाहेर पोरांना टाटा करून..
काळोख होता भयाण, पाऊस होता बेफाट,
बेल वाजली एस.टि. ची निघाली मुंबई ची वाट..
काय झालं काय जुनू, मन नव्हतं लागत
पुसले माझे डोळे मी खिडकी बाहेर बघत..
तेवढ्यात भेटला दणका हाहाकार झाला,
बस झाली पलटी पाणी आत आला..
काय करू कुठे जाऊ? क्षणात संपलं सारं,
जीव घुटमटला डोळे फिरले पाणीच पाणी सारं..
बाहेर पडणं मुश्किल होतं, तडफडलो मी आतच
बंद पडले शरीर माझे चालले तेवढे हातच..
जमलं तेवढी दिली झुंज मृत्यु च्या देवा शी,
हसत होता बघत होता खेळत होता जीवाशी..
प्रयत्न माझे संपले सारे पाण्यातच मी रडलो,
श्वास कोंडला जीव तडफडला, मृत्यूशी मी हरलो..
कोणाचं मी काय बिघडवलं असा कसा मी मेलो
माफ कर मला प्रिये तुला मी अर्ध्यात सोडून गेलो..
आई तुझी आठवण आली गं गेलो जेंव्हा मी वाहून,
किती मोठं केलंस मला तू स्वतः उपाशी राहून..
बाबा म्हणजे सावली घराची जसा बहरदार झाड,
ऐकलो नाही मस्ती केली तरी पुरवले लाड..
बायको ने हि रडून रडून अर्धा जीव केला असेल,
पोरं माझी कशी झोपतील जेंव्हा पप्पा नसेल?
मित्रांच्या हि पार्ट्या आता जरा थांबल्या असतील,
आठवण काढतील माझी कदाचित नाक्यावरती बसतील..
संपली सगळी नाती क्षणार्धात संपली स्वप्न सारी,
इच्छा राहिल्या अपूर्ण माझ्या संपली दुनियादारी..
रडू नको ना आई, का गं अशी तू करती,
तूच म्हणायचीस मोठा होशील नाव कमावशील येशील टीव्ही वरती..
बघ किती ह्या होड्या अनं हेलिकॉप्टर पण आला,
शोधायला तुझ्या लेका ला मुख्यमंत्री हजर झाला..
आमदार हि धावून आले पोलिसांची घाई
आता काय उपयोग तुमचा, करुनी कारवाई..
लवकर शोधा भावांनो आठवण घरची येते,
कधी भेटते आई मला अनं कधी छाती शी घेते
कधी छाती शी घेते
कधी छाती शी घेते.....
Tuesday, 19 July 2016
Saturday, 2 July 2016
college life
आठवतात ते कॉलेज चे दिवस
पास होण्या साठी करायचो नवस
अठावन ही आली मित्रांची
त्यांच्या सोबत घालविलेल्या त्या क्षणांची
पाहिला तो मी कॉलेज चा कट्टात्यावर बसून करायचो आम्ही थट्टा
सर वर्गात शिकवत रहायचे
शिकवलेले सर्व डोक्यावरुण जायचे
वर्गात बसल्यावर गाण लिहायचे
सर गेल्यावर तेच गाने आपण गायायचे
गाताना मात्र सुर तेच ठेवायचे
शब्द मात्र बदलवून गायायचे
कॉलेज च्या शेवटच्या दिवशी मन भरून आले
पाहता पाहता माझ्या डोळ्यात आश्रू आले
कसे ते वर्ष निघून गेले
आम्हाला कधीच नाही समजले
आम्हाला कधीच नाही समजले.
Thursday, 16 June 2016
Subscribe to:
Posts (Atom)