Wednesday, 17 August 2016

राखी

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ माझ्या जीवनाचा हरएक क्षण तुझ्या रक्षणार्थ असेल राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासचतो सदैव उरलेला असेल http://marathismita.createaforum.com/sms/235223252381235923662348230623432344-special/

Thursday, 11 August 2016

प्रेम.... मन कधी तुझ झाल, ना कळले कधी मला.... लिहीतानाही प्रत्येक शब्द आता, तुझाच चेहरा आठवतो मला... झाल अस काय अचानक, विश्वासच बसेना माझ मला... नुसतेच् भास हे वेडे मनाचे की.. खरच..... तुझ्यावर प्रेम झालय मला.... ______/______/____

Wednesday, 10 August 2016

महाड पोलादपूर ठिकाणी जी घटना घडली त्या बद्दल चार ओळी लिहित आहे, त्यांचं दुःख आणि त्यांना झालेल्या यातना कोणीही शब्दात मांडू शकत नाही पण मी एक वेडा वाकडा प्रयास करत आहे त्यांच्या वेदना तुमच्या पर्यंत पोह्चविण्या चा, काही चुकलं किंवा कोणाचं मन दुखावलं गेलं तर माफ करा.. ●●●●डोंगर दुःखाचे●●●● इच्छा सगळ्या भिजल्या स्वप्नं गेली वाहून, आई घर बांधायचं, अगं गेल ना आता राहून.. आई म्हटली नको जाऊ पाऊस जरा थांबू दे, मन माझं मानत नाही रात्र तेवढी जाऊदे.. माफी मागतो आई तुझी मी हाथ माझे जोडूनी, ऐकलं नाही काही तुझं मी गेलो तुला सोडूनी.. भाऊ माझा भोळा, बॅग माझी देऊन म्हणला दादा येताना जीन्स ये घेऊन... बहीण माझी छोटी करायचं होतं लगीन, बोलली रक्षाबंधना ला वाट तुझी बघीन.. बायको सर्व बघत होती डोळे आले भरून निघालो घरा बाहेर पोरांना टाटा करून.. काळोख होता भयाण, पाऊस होता बेफाट, बेल वाजली एस.टि. ची निघाली मुंबई ची वाट.. काय झालं काय जुनू, मन नव्हतं लागत पुसले माझे डोळे मी खिडकी बाहेर बघत.. तेवढ्यात भेटला दणका हाहाकार झाला, बस झाली पलटी पाणी आत आला.. काय करू कुठे जाऊ? क्षणात संपलं सारं, जीव घुटमटला डोळे फिरले पाणीच पाणी सारं.. बाहेर पडणं मुश्किल होतं, तडफडलो मी आतच बंद पडले शरीर माझे चालले तेवढे हातच.. जमलं तेवढी दिली झुंज मृत्यु च्या देवा शी, हसत होता बघत होता खेळत होता जीवाशी.. प्रयत्न माझे संपले सारे पाण्यातच मी रडलो, श्वास कोंडला जीव तडफडला, मृत्यूशी मी हरलो.. कोणाचं मी काय बिघडवलं असा कसा मी मेलो माफ कर मला प्रिये तुला मी अर्ध्यात सोडून गेलो.. आई तुझी आठवण आली गं गेलो जेंव्हा मी वाहून, किती मोठं केलंस मला तू स्वतः उपाशी राहून.. बाबा म्हणजे सावली घराची जसा बहरदार झाड, ऐकलो नाही मस्ती केली तरी पुरवले लाड.. बायको ने हि रडून रडून अर्धा जीव केला असेल, पोरं माझी कशी झोपतील जेंव्हा पप्पा नसेल? मित्रांच्या हि पार्ट्या आता जरा थांबल्या असतील, आठवण काढतील माझी कदाचित नाक्यावरती बसतील.. संपली सगळी नाती क्षणार्धात संपली स्वप्न सारी, इच्छा राहिल्या अपूर्ण माझ्या संपली दुनियादारी.. रडू नको ना आई, का गं अशी तू करती, तूच म्हणायचीस मोठा होशील नाव कमावशील येशील टीव्ही वरती.. बघ किती ह्या होड्या अनं हेलिकॉप्टर पण आला, शोधायला तुझ्या लेका ला मुख्यमंत्री हजर झाला.. आमदार हि धावून आले पोलिसांची घाई आता काय उपयोग तुमचा, करुनी कारवाई.. लवकर शोधा भावांनो आठवण घरची येते, कधी भेटते आई मला अनं कधी छाती शी घेते कधी छाती शी घेते कधी छाती शी घेते.....